आमची माहिती

एक प्रेरणादायी प्रवास

फेरीवाला ते बागायतदार

माणसाची खरी संपत्ती त्याच्या अवती भवती असलेल्या परिसरावरून ठरत असते. या उक्तीला स्मरून, राजापूर तालुक्यातल्या धाउलवल्ली गावातील पेशाने पोस्टमन असलेल्या शेतकऱ्याने आपला आनंद पैशात न मोजता मुक्या जनावरांच्या हास्यात आणि आणि स्थानिक रोजगार उपलब्ध करून देण्यात मिळवलाय.

गाई आणि बैल
0 +
शेळ्या
0 +
कार्यरत कर्मचारी
0 +
आंब्याची झाडे
0 +

राजेश पावसकर

द मॅंगो मॅन

बऱ्याचदा आपण सामान्य माणसाला ‘आम आदमी’ म्हणजे मँगो मॅन म्हणून संबोधतो, पण फळांचा राजा असलेल्या आंब्यांचे उत्त्पन्न घेऊन खऱ्या अर्थाने ‘मँगो मॅन’ ठरलेल्या राजेश पावसकारांची वाटचाल खूप प्रेरणादायी आहे.

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ५० किलो पेक्षा अधिक वजनाची पानाची फाटी डोक्यावर घेऊन उन्हातान्हात गावोगावी पानांची विक्री करणारे फेरीवाले आणि त्यानंतर मिळालेली पोस्टमनची नोकरी सांभाळत श्री राजेश दत्ताराम पावसकर यांनी योग्य नियोजना द्वारे शेतीला आधुनिकतेची जोड देत 1997 पासून आंबा उत्पादनात नवनवीन विक्रम प्रस्थापित केलेत. पुणे, मुंबई, राजकोट, अहमदाबाद या सारख्या शहरांमध्ये आपला “दत्तकृपा मँगो” ब्रँड चांगलाच रुजवलाय . शेतातून सोने पिकवता येते ही उक्ती खरी ठरवत एक फेरीवाला ते प्रथितयश आंबा बागायतदार असा खडतर प्रवास करून नावलौकिक मिळवलाय .

गाई -गुरांचे ,शेळ्या -बकऱ्याचे संगोपन करत राजापूर आणि देवगड तालुक्यात आपल्या आंबा बागा फुलवल्यात. निव्वळ राजापूर तालुक्यात 250+ एकराची जमिनीची मालकी असलेले हे नवनिर्मितीत विश्वास बाळगणारे आहेत.

त्यांच्या या आंबा पिकातून गावातील शेकडो हाताना रोजगार उपलब्ध झालाय आणि स्वतःबरोबर ते गावाच्या विकासात योगदान देतायत.

फेरीवाला ते प्रथितयश आंबा बागायतदार

राजेश पावसकर

आंबा लागवडीमध्ये क्रांती घडवण्याच्या दृढ दृष्टिकोनातून, राजेश पावसकर यांनी आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करून रत्नागिरीच्या प्रसिद्ध हापूस आंब्याची बागायत बनवली. त्यांच्या अथक परिश्रमामुळे प्रेरित होऊन तसेच त्यांचा दिवसागणिक वाढणारा नफा पाहून इतर शेतकरीही आंबा बागायतीच्या उत्पन्नाकडे गांभीर्याने बघायला लागले.

आज, राजेश पावसकर हे आपल्या दृढ निश्चय आणि आपल्या भूमीवरील निस्सीम प्रेमाने अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठा प्रभाव कसा निर्माण करता येतो याचे उत्तम उदाहरण ठरले आहेत. त्यांच्या प्रवासातून एक प्रचिती नक्की येते की, यशस्वी होण्यासाठी मोठ्या शहरांत स्थलांतर करावे लागतेच असे नाही—कधी कधी खरी प्रगती आपल्या घरापासूनच सुरू होते!

प्रेरणेची पेरणी

उत्सव गार्डन रिसॉर्ट

उत्सव गार्डन रिसॉर्ट ही राजेश पावसकर यांची हृदयस्पर्शी संकल्पना आहे. त्यांचे ध्येय युवकांना शिक्षण व प्रेरणा देणे आहे, तसेच निसर्गाशी निष्ठा आणि समर्पण ठेवल्यास जमिनीतूनही यशाचे अंकुर फुटू शकतात हे सिद्ध करणे.

संवादात्मक अनुभव, शेतातील वास्तव्यासह प्रत्यक्ष शिक्षणाच्या माध्यमातून, उत्सव गार्डन रिसॉर्ट कृषी, उद्योजकता आणि ग्रामीण विकासाविषयीची आत्मीयता निर्माण करते.
विश्रांती हवी असेल किंवा नव्या ज्ञानाच्या शोधात असाल, ही जागा तुमच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी, वाढीसाठी आणि निसर्गाशी नाते दृढ करण्यासाठी करण्यासाठी उत्तम आहे.

 

Check Availability

1 Room, 1 Adult, 0 Children
Rooms
Adults
Childrens