होम

नोव्हेंबर 8, 2024 2025-07-27 12:01

Escape to Kokan

Mango-Lover's Dream Resort

स्टाईल आणि समाधानाने व्हा

शांत , निवांत आणि उत्साही

उत्सव गार्डन रिसॉर्ट मध्ये तणावमुक्त आयुष्याचा आनंद घ्या. 12 एकरहून अधिक असलेल्या आमराईत फेरफटका मारत मन प्रसन्न करा, आणि हो तुमचा आनंद द्विगुणित करायला आमची लज्जतदार मेजवानी तुमची वाट पाहतेय.

12+ एकराची आमराई

समृद्ध हिरवाई आणि शांत वातावरण

स्विमिंग पूल

लहान आणि मोठ्यांसाठी स्वतंत्र स्विमिंग पूल

आंबा पर्यटन

1000+ आंब्यांच्या बागेमध्ये फेरफटका

पशूसंवर्धन

150+ शेळ्या आणि 20+ गाईंचा कुटुंब कबीला

रेन डान्स

मनपसंत गाण्यावर थिरकताना अनुभवा आनंद सरींचा वर्षाव

डेस्टिनेशन वेडिंग

स्वप्नवत लग्नसोहळ्याचे उत्तम ठिकाण

व्हेज - नॉन व्हेज पदार्थ

अस्सल कोकणच्या चवीचे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ

ने-आण व पर्यटन

सुलभ प्रवास, सोयीस्कर दरात!
प्रेरणादायी प्रवास

उत्सव गार्डन रिसॉर्ट

केवळ पर्यटन नव्हे, तर निसर्गाशी नातं जोडत नवीन पिढीला शेती संस्कृतीची जाणीव करून देण्याचा आम्ही घेतलेला ध्यास.

अनुभवा

शांतता आणि निवांतता

आमच्या स्वच्छ , नीटनेटक्या आणि आरामदायी निवासाचा आनंद घ्या. उत्कृष्ट आतिथ्य आणि आधुनिक सुविधा अनुभवत निसर्गाच्या सान्निध्यात रमून जा..

Explore

आमच्या सर्व्हिसेस

आमचे रिसॉर्ट निसर्ग, आराम आणि अस्सल कोकण संस्कृती यांचा परिपूर्ण संगम प्रदान करते. आरामदायी रूम्स, चविष्ट स्थानिक पदार्थ, काजूच्या आकाराचा स्विमिंग पूल आणि आमच्या पाहुणचाराचा आनंद घ्या.

नैसर्गिक शांतता , आरामदायी रूम्स आणि कोकण खाद्य संस्कृतीचा अनोखा संगम.

आवर्जून पाहण्याजोगी ठिकाणे

भटकंती आणि बरंच काही

कोकणातील नयनरम्य दृश्ये,स्वच्छ , नितळ समुद्रकिनारे, विलोभनीय सूर्योदय आणि सूर्यास्ताचे साक्षीदार व्हा, जेथे हिरवीगार निसर्गरम्य दृश्ये आणि स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे तुमची वाट पाहत आहेत आणि सुट्टीचा परिपूर्ण आनंद लुटा.

कातळ शिल्प

अनेक वर्षांची परंपरा असलेल्या प्रागैतिहासिक मूर्तिकला आपल्याला पुरातन संस्कृतीची ओळख करून देते.

व्येते किनारा

माणसांच्या गर्दीपासून दूर असलेल्या, निवांत समुद्राच्या लाटांच्या आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण.

कशेळी किनारा

स्फटिकासारखे स्वच्छ निळेशार पाणी आणि मनमोहून टाकण्याऱ्या निसर्ग सानिध्यसाठी उत्तम ठिकाण.

श्री महाकाली मंदिर, आडिवरे

प्राचीन इतिहास असलेले मंदिर, जे दररोज सकाळी 6:00 ते संध्याकाळी 7:30 या वेळेत विनामूल्य दर्शन आणि पूजेसाठी उपलब्ध असते.

श्री कनकादित्य मंदिर, कशेळी

एक दुर्मिळ आणि पुरातन सूर्यमंदिर, जे दररोज सकाळी 6:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत भाविकांसाठी खुले असते.

धूतपापेश्वर मंदिर

पावसाळ्यातील ओसंडून वाढणारा धबधबा या पवित्र जागेची मनमोहकता अजूनच वाढवतो. या मंदिर परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे.

Check Availability

1 Room, 1 Adult, 0 Children
Rooms
Adults
Childrens